पोलादी पुरूषस्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्यानंतरही देश उभारणीत सिंहाचा वाटा उचलणारे महान नेतेमहात्मा गांधीचे अत्यंत विश्वासू सहकारीअशी अनेक बिरूदावली ज्यांच्या नावामागे लागते, ते सरदार वल्लाभाई पटेल केवळ एक आदर्श व्यक्तीच नव्हते तर अत्यंत हुशार आणि गरज पडल्यास तितकेच कठोर नेते होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातील 500 पेक्षा जास्त संस्थानांना भारतात विलीन करण्याचे अत्यंत अवघड काम त्यांनी लिलया पार पाडले. त्यांच्या या महान महान कार्याची दखल म्हणूनच संपूर्ण जग त्यांनाआयर्न मॅनकिंवा पोलादी पुरूष म्हणून ओळखत होते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबाबत आणखी माहिती जाणून घेण्यास आपण उत्सुक असालतर चला मगभारताचा इतिहास आणि भूगोलही ज्यांनी बदलला, अशा महान नेते, सरदार वल्लभभाई पटेल यांची आपण माहिती घेवूयात आवाज डॉट कॉमवर