भारत देश हा अनेक कथा आणि गोष्टींची भूमी आहे. विशेष गोष्ट हि आहे कि या कथा इथल्या सभ्यता आणि संस्कृतीबद्दल सांगतात. आपण आपल्या आज्जी – आजोबांकडून बऱ्याच ऐतिहासिक कथा ऐकल्या असतील . आमच्या या शो मध्ये तुम्ही अशाच काही धार्मिक आणि पौराणिक कथा ऐकणार आहात.
-
शिवपार्वती विवाह भाग 1
या भागात आपण ऐकणार आहोत की, कशाप्रकारे देवी पार्वतीने भगवान शिव-शंकराला मिळविण्यासाठी तपस्या केली.
-
शिवपार्वती विवाह भाग 2
या भागात तुम्ही ऐकाल , देवी पार्वतीने शिव शंकराचे असे कोणते गुण सांगितले , जे ऐकून स्वतः शंकरानी देवी पार्वतीला दर्शन दिले आणि देवी पार्वती सोबत विवाह केला.
-
शंखचूडची कथा भाग 1
दंभपुत्र शंखचूड यांनी ब्रम्ह देवाची तपस्या केली. ब्रम्हदेव प्रसन्न झाले. त्यांनी शंखचूडला कोणते वरदान दिले. ते वरदान देवांनाही कसे वरचढ ठरले हे ऐका आजच्या भागात.
-
शंखचूडची कथा भाग 2
शंखचूडविरूध्द इंद्र देवाने घेतली शंकराकडे धाव. शंखचूड स्वर्ग लोकातील देवांनाही ठरला होता श्रेष्ठ. काय होत कारण हे जाणून घ्या आजच्या भागात
-
कृष्ण भगवान का झाले सारथी ?
श्रीकृष्ण भगवान धनुर्धर अर्जुनाचे सारथी झाले होते. श्रीकृष्ण सारथी होण्यामागे कोणते कारण होते. कुरुक्षेत्रात श्रीकृष्णाने अर्जुनाला कोणता उपदेश दिला हे ऐका आजच्या भागात
-
हनुमानचा सेवा भाव
हनुमान श्रीरामाचे परम भक्त आहेत, हे सर्वश्रूत आहे. तरीही, आपल्याला असे वाटते का की हनुमानला रामाची सेवा करण्याची संधी मिळूच नये? हा विचारच अकल्पनिय आहे. मात्र, आज आम्ही तुम्हाला अशी कथा सांगणार आहोत, जी हनुमान ला रामाच्या सेवेपासून परावृत्त केल्यावर काय होते.?
-
भक्तिचा चमत्कार
आज आपण अशा शिवभक्ताची गोष्ट ऐकणार आहोत की ज्याने आपल्या निस्वार्थ भक्तीने आणि प्रेमाने केवळ शिवभक्त म्हणूनच नव्हे तर शंकराचा गण म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. ऐका तर अशा शिव भक्ताची कथा...
-
महात्मा बुध्द
एक दिवस गौतम बुध्द आपल्या शिष्यांसोबत सात जंगलातून जात होते. काही अंतरावर त्यांना खूप तहान लागते. त्यांनी पाणी आणण्यासाठी शिष्याला आदेश दिला. काही अंतरावर असणाऱ्या नदीतून पाणी आणण्यासाठी शिष्य गेला. मात्र, जंगली प्राण्यांमुळे ते पाणी अशुध्द झाल्याचे लक्षात आल्याने तो शिष्य पाण्याविना परत आला. पुन्हा त्या शिष्याला गौतम बुध्दांनी त्याच नदीतील पाणी आणण्यासाठी पाठवले. शिष्य पुन्हा त्या नदीकडे गेला आणि त्याने काय पाहिले हे ऐकूया आजच्या भागात..
-
महावीर
चंडकौशिक नावाच सर्वात विषारी साप होता. हा महाभयंकर साप भगवान महावीर यांच्यासमोर आला. त्यावेळी या सापामध्ये कोणता बदल झाला हे आजच्या भागात ऐकणार आहोत..
-
अमरनाथचा उद्देश्य
तसं पाहिले तर खुप सारे भक्त अमरनाथ यात्रेला जातात. मात्र, ठराविकच भक्तांनाच अमरनाथ नावामागील रहस्य माहिती आहे. अमरनाथाच्या गुहेत आजही दोन अमर कबुतर वास करतात. ज्यांना शंकर-पार्वतीचे वरदान मिळाले आहे. असच काही तरी आपल्याला आजच्या भागात ऐकायला मिळणार आहे...
-
हनुमानवर प्रसन्न शनीदेव
आजच्या भागात हनुमानच्या जीवनातील एक असा किस्सा ऐकवला जाईल. ज्यामध्ये हनुमानाने शनीदेवाच्या अहंकार आणि क्रोध धुळीस मिळवला. यासोबत हेही ऐकायला मिळेल की शनिदेवाची पुजा करताना आपण त्यांना तेल का वाहतो..