आपला भारत देश महान परंपरा,प्राचीन धर्म, अध्यात्म, विनयशील आचरण आणि अतूट भक्तीचा देश म्हणून ओळखला जातो.  जगात सर्वत्र भारताला मंदिरांचा देश देखील म्हणतात. भारतात आपल्याला रस्त्याच्या प्रत्येक  कोपऱ्यावर आणि चौकाचौकात मंदिरे पहायला मिळतात. आपल्या देशात बरीच मंदिरे अशी आहेत, जिथे अनेक गूढ गोष्टी आहेत….त्यांचा उलगडा आजतागायत होऊ शकलेला नाहीज्यांनी विज्ञानासमोरहि आव्हान निर्माण केले आहेकाही मंदिरामध्ये  अविश्वसनीय किंवा चमत्कार म्हणता येतील अशा गोष्टी आपल्या नजरेस पडतात, अनुभवता येतातउदाहरणार्थहिमाचल प्रदेशातील ज्वालादेवीच्या मंदिरात गेली शेकडो वर्षें विना तेल, विना तुपाच्या मशाली अखंड पेटत आहेत….त्या कशा अखंड प्रज्वलित राहतातयाचा आजही उलगडा होऊ शकलेला नाही

भारतासारखी संपन्न प्राचीन संस्कृती जगातील अन्य कोणत्याही देशात आपल्याला पाहायला मिळत नाही. तर मग आपण जाणून घेऊयाभारतातील काही सर्वोत्कृष्ट आणि प्राचीन मंदिरांबद्दलत्यांच्या इतिहासाबद्दलत्यांच्या रहस्यांबाबतज्यातील काही रहस्ये इतके वैज्ञानिक यश मिळाल्यानंतरही उलगडा करू शकलेली नाहीतभारतातील ही मंदिरे  त्यांच्या अद्वितीय वास्तू, आकर्षक रचना आणि समृद्ध इतिहासासाठी प्रसिध्द आहेत. जर आपण अमरनाथ मंदिर, बाहुबली मंदिर, जगन्नाथ मंदिर, ज्वाला देवी मंदीर, कामाख्या देवी मंदिर, रामेश्वर मंदिर, सोमनाथ मंदिर अशा कोणत्याही मंदिराला  भेट दिली तर आपल्याला श्रद्धा , अध्यात्म आणि सांस्कृतिक वैभव पहायला मिळतेअसे वैभव आपल्याला जगात कोठेही पहायला मिळणार नाही

तर, चला मगआज याभारतातील सुप्रसिद्ध मंदिरे आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कथाया विशेष मालिकेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला भारतातील प्रसिद्ध मंदिरांची ओळख करून देतो….