वऱ्हाडातील शेगांव प्रसिद्ध झाले ते संत गजानन महाराजा यांच्या पुनीत वास्तव्याने . भक्तांच्या कल्याणासाठी ते शेगांवात प्रकटले. ते सततगण गण गणात बोतेहे भजन करत असल्याने , लोकांनी त्यांना संत गजानन महाराज हे नाव दिले. विविध चमत्कार करून त्यांनी अनेकांना साक्षात्कार घडविला. लोकांना भक्तिमार्गाचे महत्व पटवून देऊन लोकांच्या मनामध्ये भक्तीचा जागर  केला. अशा या संत गजानन महाराजांचं कथारूपी चरित्र जाणून घेऊया.