ओळख थोर संतांची या शृंखलेत संत, भक्त, कवी, तत्वज्ञ व समाजसुधारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतांची महती गौरविली आहे . इसवीसन बाराशे ते इसवीसन एकोणीसशे मधील हे संत म्हणजे आपल्या इतिहासाला, गुरुपरंपरेला, आपल्या साहित्याला, मानवता धर्माला मिळालेले अमोल ठेवा आहेत. यांची ओळख तर तुम्हाला आधीपासूनच आहे परंतु यांच्या जीवनकार्याची विस्तृत माहिती आपण या शृंखलेत पाहू.