आभा एक लग्नाळू मुलगी..पण तिचा वर संशोधनाचा सर्च अजून संपला नाहीये. ह्या सिझन मध्ये आभा अजून काही मुलांना भेटते..अटी त्याच पण मुलं वेगळी.. आभा ला योग्य वर मिळेल? जाणून घेण्यासाठी ऐका मिशन आभा चे लग्न – Season 2
लेखिका- अनुजा कुलकर्णी.
-
आरुष
आरुष आभा ची भेट अर्ध्यावर सोडून निघून गेला पण आभा च्या मनातून मात्र तो गेला नव्हता.. आता आभाच्या आयुष्यात पुढे काय?
-
राजकुमारी आभा
स्वप्नात राजकुमार पाहून आभा सुद्धा आता स्वतःला राजकुमारी समजायला लागली .. आणि अर्थात राजकुमारीच्या अपेक्षा साध्या नसतात..
-
पुन्हा दिवास्वप्न
आभा च्या आयुष्यात अजूनही कोणीही राजकुमार आला नाहीये पण तरीही तिचे स्वप्न पाहणे काही थांबत नव्हते. आता आभा वेगळ्याच स्वप्नात बुडाली होती.
-
पेपर मधली जाहिरात
आभा ची आई पेपर मध्ये एक जाहिरात पाहते.. आणि तिचा समज होतो ही जाहिरात आभा साठीच आली आहे.. काय आहे ते जाहिरात?
-
आभा चा होकार
आभाचा बाबा तिला पेपर मधल्या जाहिराती बद्दल सांगतो पण आभा कुरकुर करते.. तिच्या आईने सांगितल्यावर ती होकार देते.
-
राज ये नाम तो सुना ही होगा ?
आभा आणि राज ची भेट नक्की होते.. राज म्हणल की शाहरुख खान आलाच.. त्यात तो आभा चा आवडता हिरो त्यामुळे राज बरोबर आभा च लग्न ठरण्याचे चान्सेस आहेत..
-
आभा चा प्रश्न
आभा आणि राज भेटतात आणि गप्पा मारता मारता मारता आभा राज ला काही प्रश्न विचारते..
-
वाद
राज आणि आभा चे विचार पटतात पण वाद होतो तो आभा आणि राज च्या आई मध्ये.
-
आभाचा नकार
आभा ला राज आवडतो पण काही कारणाने तिला त्याच्या आईच वागण आवडत नाही आणि आभा राज ला नकार देते... पण राज ला मनातून आभा आवडते..
-
मिनी स्वयंवर
शेवटी आभा ची इच्छा पूर्ण करण्यासाठी मिनी स्वयंवर ठरवतात. ह्या स्वयंवरात आहेत फक्त आरुष आणि राज... शेवटी आभा च लग्न कोणाशी होतं? आभा च मिशन लग्न यशस्वी होतं?