कधी कधी आयुष्य अश्या वळणावर येऊन थांबत की भूतकाळ विसरता येत नाही.. भूतकाळाला बरोबर घेऊन वर्तमानकाळ जगावा लागतो…. पण काय आहे आरुष चा भूतकाळ आणि आरुष चा भूतकाळ कळल्यावर काय असेल अनिशा ची प्रतिक्रिया? हे जाणून घ्यायला ऐका, अनुजा कुलकर्णी लिखित कथा- द्वंद्व- नात्यातला संघर्ष..
-
महत्वाचे काम
आरुष काहीतरी महत्वाचे मेल लिहित असतांना अनिशा काहीतरी गुड न्यूज घेऊन येते.. पण आरुष त्याचा लॅपटॉप लगेच बंद करतो.... आरुष काय महत्वाचे काम करत असतो? आणि अनिशा कडे काय गुड न्यूज असते?
-
१ लाख रुपये
अनिशा गुड न्यूज देते आणि तिला एकदम आरुष च्या लॅपटॉप १ लाख रुपये वाचलेले आठवते.. ती त्याची चौकशी करते पण आरुष उडवाउडवी करतो.. आरुष काय लपवतो आहे?
-
पार्टी
आरुष त्याच्या प्रमोशन ची पार्टी अनिशा ला द्यायचे कबुल करतो.. दोघे कॉफी शॉप मध्ये भेटायचं ठरवतात..
-
प्रपोज
अनिशा चे आरुष वर मनापासून प्रेम असते आणि आरुष ला प्रमोशन मिळाल्यावर ती कॉफी शॉप मध्ये आरुष ला प्रपोज करते. पण काय असेल आरुष ची प्रतिक्रिया?
-
टाळाटाळ
अनिशा च्या अचानक प्रपोज मुळे आरुष थोडा विचारात पडतो.. त्याला लगेच होकार द्यायचा नसतो त्यामुळे तो अनिशा ला टाळायचा प्रयत्न करतो..
-
अट
अनिशा आणि आरुष रात्री जेवायला भेटतात.. आता अनिशा आरुष ला स्पष्ट विचारते होकार की नकार.. आरुष विचार करून होकार सांगतो पण त्या होकार बरोबर एक अट सुद्धा घालतो.
-
दत्तक बाळ ?
आरुष च्या अटी मुळे अनिशा विचारात पडते.. त्याला बाळ दत्तक का घ्यायचे आहे ह्याचा अनिशा ला अंदाज येत नाही..
-
द्वंद्व
अनिशा आणि आरुष च्या मनात काय द्वंद्व चालूये? दोघांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे सापडतील?
-
अनाथाश्रम
आरुष अनिशा ला एका अनाथाश्रमात घेऊन जातो. तिथे आरुष का घेऊन आला आहे हे अनिशा ला समजत नसते पण सगळी गुपित त्या अनाथाश्रामाशीच जोडली गेली आहेत ह्याची खात्री अनिशा ला पटते.
-
कीर्ती
आरुष अनिशा ला एका गोंडस बाळाला भेटवतो.. तिच नाव कीर्ती असत.. पण कोण आहे ही कीर्ती? तिचा आणि आरुष चा काय संबंध?
-
तोच तो सेम तीळ..
कीर्ती आणि आरुष च्या गालावर सेम तीळ... याच रहस्य काय आहे? अनिशा ला सत्य कळेल?
-
ऑल वेल दॅट्स एंड्स वेल
शेवट गोड तर सगळच गोड.. सगळी गुपितं बाहेर पडून सुद्धा अनिशा मोठ्या मनाने आरुष आणि बाळाचा स्वीकार करते..